‘ट्रेन दुरून दिसायला लागली आणि सगळे सावरले. अशा वेळेला हृदयाचे ठोके वाढतातंच माझे. ट्रेन जवळ जवळ येते आणि सगळे बॅगा, सामान सावरतात तेव्हा हेच ते भयानक आयुष्य असं वाटून जातं मला. ट्रेन थांबता थांबता सगळे आक्रमण करू लागले. मीही जोर काढून मुसंडी मारली. खिडकीचा मोह नसतो मला पण सी. एस. टी. येईपर्यंत बसायला चौथी सीट तरी. अरे… ऐन वेळेला जेवणाचा डबा निसटला खांद्यावरून. असा कसा निसटला… कळलंच नाही… आपण नियतीच्या हातातलं कळसूत्री बाहुलं आहोत हे मला आता शंभर टक्के पटलं. आतापर्यंत योगायोग म्हणून सगळे अंधश्रध्दा वाटणारे विचार आपण टाळत आलो. पण असं अजिबात नाहीय. डबा उचलण्याच्या अथक परिश्रमात पूर्ण अवसान घात झाला होता. सगळे धक्काबुक्की करू लागले. मागचे “अरे क्या हुआ… क्या हुआ” म्हणून ओरडू लागले. आणि सगळ्या बाजूने लोटालोटी करून लोकं ट्रेन मध्ये शिरली. डबा उचलून कसाबसा मी शेवटी चढलो. पण गर्दीचा समुद्र नुसता उफाळला होता. काठ काही मिळेना. सगळ्या सीट भरल्या होत्या. आपण कपाळ करंटेच. उलट आज बसायची गरज होती. जीव नुसता थकून गेलाय मीनाक्षीच्या बोचऱ्या बोलांनी.’
Tag: stories
गरज
‘आज ट्रेन ची गर्दी जास्तच त्रासदायक होती. कधी एकदा घरी जाऊन बिछान्यात कोसळते असं झालं होतं. शक्तीच नाहीशी झाली होती.
धादांत खोटा आरोप होता माझ्यावर!
समज
‘घणाघणा अलार्म वाजतो आणि खडबडून जाग येते. हे नेहमीचं, तरी अजून सवय झाली नाही. मागच्या वेळी मंदा आत्त्या धडपडून पडली. पश्चाताप झाला गाढ झोपले त्याचा! होउ शकतं ना कधीतरी. नथिंग इज इन्फ़ोलीबल. आत्या सुद्धा पडू शकते, त्यात काय! दमले आहे खरंतर मी!! आत्या वारल्यावर दुःख होईल… की आनंद…’ हा विचार तिने दाबून टाकला!
‘मंदा आत्त्याने मला लहानपणापासून सांभाळलं. मला काहीच धड जमलं नाही म्हणून मी दिवसभर आत्त्याला सांभाळते, आत्त्याचं कुणी नाही म्हणून आत्त्याला सांभाळते, की आत्त्याच्याच पैशावर मी अवलंबून आहे म्हणून आत्त्याला सांभाळते…’ हे ही विचार इतर विचारांसारखे दाबून टाकले. ‘आयुष्य एक भयानक रुटीन झालंय. मंदा आत्त्याचा आजार मलाच गुरफटून राहिलाय. कधी वाटतं या लंग फाय्ब्रोसीस ची सवय झालीय मला, पण नाही. झोपेचं खोबरं होतं आणि डोक्यावर आठ्या पडतातंच. मनात चीड येते. मग मी मुद्दाम आत्तेच्या डोक्यावरून हात फिरवते. तिला माझी ही चीड समजू नये म्हणून की काय… असेल… नथिंग इज इन्फ़ोलिबल! माणूस सवयींचा गुलाम असतो. पण फक्त व्यसनाधिन सवयींचा…’
*********
दरवाजावर बेल वाजली आणि गितिकाने दरवाजा उघडला.
द्रुष्टिकोन
रचना ऑफिसला जायची तयारी करत होती. रचना आजपर्यंत कधी लेट गेली नव्हती. ती खूप पंक्चुअल होती कामाच्या बाबतीत. म्हणून तर वयाच्या ३० व्या वर्षी ती कंपनी ची मॅनेजिंग डिरेक्टर होती. प्रसाद बरोबर घटस्फोट झाल्यावर तर तिने कामाला जुंपून घेतलं होतं. तिला हायसं वाटायचं की तिला मुलं तरी नाहीत. मुलांची जबाबदारी घेऊन एकटीने आयुष्य कंठायचं कठीण वाटायचं तिला. पण तिला स्वतःविषयी खूप आदर होता. तिच्यामुळे कंपनी खूप नफ्यात आली होती. भन्नाट कल्पनांचं माहेरघर होतं तिचं डोकं. कमालीची केश रचना, अफलातून कॉर्पोरेट कपडे आणि उंची मेकअप करून ती ऑफिसला जायला निघायची तेव्हा अख्ख्या बिल्डिंग च लक्ष तिच्याकडे जायचं. पण अख्ख्या बिल्डिंग मधे तिच्याशी बोलायची कुणाची हिंमत नव्हती, लक्ष्मी मामींशिवाय!
आनंदाचे सोबती
आनंदाने आरशात रुपडं न्याहाळलं आणि तिरपा भांग पाडून तो स्वतःकडे पाहातच राहिला. तो स्वतःच्या दिसण्यावरही खुश होता आणि असण्यावरही… दिनक्रम जगणं म्हणजे त्याच्यासाठी काहीच कसरत नव्हती. मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या तो सहजा सहजी पेलायचा आणि आयुष्यात पुढे पुढे जात राहायचा. आपल्या देखण्या अस्तित्वावर अत्तराचा फवारा मारून ते आणखी गडद करून तो घराबाहेर पडला. शीळ मारत, गाणं म्हणत हवेवर तरंगत तो बागेच्या दिशेने चालत राहिला. आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या नेटाने सांभाळून फावल्या वेळात तो आपले छंदही जोपासायचा. बागेत आठवड्यागणिक एक फेरफटका तर व्हायचाच. बाग हे आपलं अस्तित्व अनुभवायला अगदी योग्य जागा वाटायची त्याला.
चालताना अचानक वाटेत त्याला दुखी व भित्या दिसले.
ती सध्या अशी काय करते???
मी बसलो होतो. हो प्यायलाच बसलो होतो. एकटाच… दर वेळेस कोण चिअर्स करणार? रात्रीचे ११:३० वाजले होते. आणि अचानक व्हॉटसऍप वर रिंग आली. व्हॉटसऍप तर वाजतंच असतं फक्त वातावरण निर्मिती व्हावी म्हणून हे अचानक वगैरे… घटनाच तशी होती. प्रसन्न नावाच्या माणसाने व्हॉट्सअँप वर ग्रुप बनवला होता. नाव ओळखीचं वाटलं. फोटो पाहून लक्षात आलं. अरे हा तर आपल्या शाळेतला… शाळेचा ग्रुप! बरं वाटलं. अनेक वर्षांनी मित्र भेटणार… पण हि ख़ुशी थोड्याच वेळ टिकली. ग्रुप मध्ये ती असेल तर? भराभर सगळी नाव तपासली…ती नव्हती त्यात… आणि जीव भांड्यात पडला.
ग्रुप वर निरनिराळ्या गप्पा सुरु झाल्या. आणि कुणीतरी तिचा विषय काढला. ती प्रीती कुठे आहे? सध्या काय करते? दुसरं कुणी म्हणालं डॉक्टर झालीय. प्रीती बेलांडे आता. दोन मुलं सुध्दा आहेत. क्षणभर हृदयात कळ आली. असं असेल हे ठाऊक असूनही… मी असाच बसून राहिलोय… हि नाही ती नको मग शेवटी कुणीच नाही… माझ्यावर प्रेम आहे म्हणून रडली होती मग ती असं कसं करते… कुणी तरी म्हटलं बिझी असते फार… पण दोन दिवसात व्हॉटसऍप वर येईल… दोन दिवसांत येईल… कुठेतरी हुरहूर वाटली. ती आता काय बोलेल माझ्याशी!!!
प्रेम – एक अनुभव
मी “त्या”ला मेसेज केला ‘मीस यू’
“त्या”चं उत्तर आलं ‘हे काय नवीन?’
मी हसले.
मी: “मनाचे खेळ”
“तो”: “तुला माहीत आहे माझं तिच्यावर प्रेम आहे. तिच्या नुसत्या आठवणीत मी उरलेलं आयुष्य घालवू शकतो”
मी पण काय वेडी आहे. माहीत असून पुन्हा पुन्हा…
मूर्ख आहे “तो”. “त्या”चं कसलं प्रेम!! ती एका फटक्यात त्याला सोडून गेली. मागे वळूनही पाहिलं नाही. याला काय प्रेम म्हणतात…
मी पुढे निघून जायचं ठरवलं. या वेळेस पक्कं….
अक्षता
व्हाट्सऍप ग्रुप वर नुसती धमाल उडाली होती. शाळेच्या मुलींची फर्स्ट मिट… इतक्या वर्षांनी. मृणाल आणि विभावरी तर इतके बोलत होते की विचारू नका. ड्रेस कोड काय ठरवायचा, खायला कोण काय काय आणणार, कोणाचं शाळेतलं कोणतं टॉपिक चर्चेत आणायचं सगळं ठरत होतं. सगळ्या मिळून अकरा मुली स्मिता च्या घरी भेटणार होत्या. कधी गप्पांमध्ये शामिल न होणाऱ्या शांत मुलीही होत्या या मिट मध्ये म्हणून सगळ्यांना आनंद होता.
विभावरी: “सारिका तुझं नक्की झालं का?”
सारिका: “नाही ग अजून. आज संध्याकाळपर्यंत सांगते.”
विभावरी: “प्लिज जमव ग. पुन्हा कधी भेटू आपण सांगता येत नाही.”
सारिका: “हो मी येणारच आहे मोस्टली. पण आताच कन्फर्म करत नाही.”
निवेदिता: “अरे गुलाबजाम आणणार आहे का कोणी? मी गुलाबजाम आणण्याचा विचार करत होते.”
स्मिता: “अगं गुलाबजाम मी बनवतेय. तू दुसरं काहीतरी बनव.”
प्रेरीता: “अरे माझ्याकडे वन पीस नाहीय…”
मृणाल: “मग घे विकत.”
प्रेरीता: “बरं बघते. एक असलेला बरा, चेंज म्हणून.”
मृणाल: “पूर्ण एक आठवडा आहे रविवार ला अजून. व्यवस्थित तयारी करा.”
विभावरी: “अरे या हा सगळे. कुणी टांग दिली तर बघा.”
रविवारी स्मिता च्या घरी छान वातावरण झालं होतं.