स्नेहा ने काठी घेतली, पर्स घेतली, चपला घातल्या व ती निघाली. तिचा एक पाय तोकडा आणि वाकडा असल्याने तिला काठी घ्यावी लागायची. वडील तर वारलेच होते, या वर्षी आईही वारली. आता ती पूर्ण एकटी होती. ती अजूनच घुमी झाली होती. ऑफिसच्या लोकांशी बोलणं कामापूरतच होई. थोडे शांत एकटे क्षण मिळाले की तिच्या डोळ्यात अश्रू येत व ती देवाला रागाने दूषणं देई. ‘का असं लंगडीचं आयुष्य दिलं आहेस मला.’ तशी आधी ती फार बोलकी होती अशातला भाग नाही. तुसड्या स्वभावासाठी ती प्रसिद्ध होती. तिला पटकन राग येई. पण आई गेल्यानंतर ती आणखीन कडवट झाली होती. तिने समजून घेतलं होतं आपल्याला आपल्या कमतरतेमुळे एकटंच जगायचंय आणि हा एकटेपणाच तिला भेडसावत होता.
स्नेहा ऑफिस ला पोचली तेव्हा कोपऱ्यातल्या डेस्क वर खूप कल्ला चालू होता.