पाऊस तर थांबतच नव्हता. तिसऱ्या मजल्यावरच्या सक्सेनांकडे राऊतांच कुटुंब येऊन थांबलं होतं. चौपाटीजवळ कौतुकाने घेतलेलं घर, अतिशय विचार करून साकारलेलं इंटिरिअर… ते पण याच वर्षी. सौ राउतच नाही तर श्री राऊतांच्या मनातसुद्धा हेच विचार चालले होते. फक्त पूर्ण कुटुंबाने धीर सोडू नये म्हणून ते भीती आणि त्रास चेहऱ्यावर येऊ देत नव्हते. पाणी घरात शिरलं आणि शक्य तेव्हढं महत्वाचं सामान घेऊन नवरा बायको व त्यांचा एक मुलगा एक मुलगी असं चौकोनी कुटुंब सक्सेनांच्या घरात आलं. पण पाऊस तर अविरत चालला होता… सगळेच शांत बसले होते आणि सौ सक्सेना स्वयंपाकघरातून आल्या.
सौ सक्सेना: “खाना लगाया है। खा लेते है।”
पूर्ण वाचा
Tag: stories
समज – गैरसमज
निळकंठ निकम, वय ७५ वर्ष, उत्साही, आणि वयाच्या मानाने दिसायला तरुण! खूप कौतुक व्हायचं त्यांचं त्यांची ठणठणीत तब्बेत बघून. त्यात मोकळा बोलका स्वभाव. जिथे जायचे तिथे मैफिल रंगवायचे. आजही ते नेहमीच्याच उत्साहात ठाण्याच्या त्यांच्या हृदय विकार तज्ञांना भेटून आले होते. त्यांनी दारावरची बेल वाजवली आणि त्यांच्या सुनेने नम्रताने दार उघडलं.
निळकंठ निकम: “एकदम ठणठणीत आहे मी….
पूर्ण वाचा
बॅड लक!
‘शेवटी आज तो दिवस आला… आज तर खात्रीच झालीय मला! किती सोहळा केला होता तिला आणताना.. एका सहित सगळं संपवलं. तिने वळूनही नाही बघितलं जाताना. भांडणं, मतभेद काय नवरा बायकोत होत नाहीत… एव्हढं काय बिनसलं! इतका दुस्वास… ‘
राहुलला कळेना आपल्या आयुष्यात होतंय काय. एक एक करत पत्ते कोलमडत होते आणि घर उध्वस्त होत होतं. हातातून वाळू निसटून जावी तसा आयुष्याचा लगाम हातातून सुटत चालला होता. एक व्यावसायिक नाटक येणार होतं दिग्दर्शक म्हणून… तेव्हाच का कोरोना यावा आणि सगळं उत्पन्नच थांबून जावं.. बायको, व्यवसाय सगळं सुटलं आणि एका अथांग खोल डोहासारखं आयुष्य घाबरवत राहिलं. ‘स्वप्न पडतात चित्र विचित्र.. झोपेतही शांतता नाही.. देव आहे का? आणि तो असेल तर त्याला हवंय काय? आणि तो नसेल तरी मीच का? सगळं माझं बॅड लक. मी अनलकी आहे.’…
पूर्ण वाचा
पुन्हा एकदा…
चिंटू घरभर नवीन रिमोटची कार घेऊन फिरत होता. धावपळ करणारी त्याची आई संध्या, मध्ये मध्ये येणाऱ्या चिंटूला दटावत होती. चिंटू सॉरी आई म्हणत होता पण त्याची कार नवीन असल्याने त्याला आवरता येत नव्हती आणि मधेच स्वयंपाकघरात शिरत होती. चिंटूच्या आजी लक्ष्मीबाई आईला स्वयंपाकात मदत करत होत्या. चिंटूचे आजोबा नरहर खरे सुद्धा तिथे लुडबुड करत होते. खरे कुटुंब म्हणजे गुण्यागोविंदाने एकत्र नांदणार कुटुंब. एक गोष्ट फार वेगळी होती. बायकांची कामं पुरुषांची कामं असा भेदभाव नव्हता. संध्या सरकारी नोकरीत छान सुप्रीटेंडन्ट होती. लक्ष्मीबाईंनी शाळेची मुख्याध्यापिका बनून निवृत्ती घेतली होती. चिंटूला सध्या थोडी थोडी कामांची सवय लावली जात होती. आईचं स्पष्ट मत होतं की जेवण बनवणं, घरची काम करणं हे लाईफ स्किल आहे आणि ते सगळ्यांना आलंच पाहिजे. सगळेजण मिळून मिसळून काम करायचे आणि सगळे मिळून मिसळून रिकामा वेळ साजरा करायचे. खूप गप्पा मारायचे, चिंटू बरोबर खेळायचे, कॅरम, पत्ते, आणि खूप धमाल.
पूर्ण वाचा
एक जिवंत माणूस
दिपिकाचे डोळे उघडले. फक्त ५ वाजले होते. “झोपेनेही साथ सोडली की काय!” तिच्या मनात आलं. समोर दिवस आ वासून अस्ताव्यस्त पसरला होता. ती उठली पण एव्हढ्या लवकर काय करणार म्हणून परत झोपली. करोना येऊन २ वर्ष आणि नोकरी जाऊन बरोब्बर एक वर्ष. छतावर पंखा गर गर फिरत होता. त्याच्या कटरकट्ट कटरकट्ट आवाजाची एक त्रासदायक लय निर्माण झाली होती.
पूर्ण वाचा
टिंब
आई आरुषबरोबर फोन वर बोलत होती. पण आरुष काही नीट बोलेना.
आरुष: “आई मी बोलतो नंतर. खाली मित्र वाट बघत आहेत.”
आई: “एव्हढी काय रे घाई… किती दिवसांनी फोन केला आहेस एकतर!”
आरुष: “बिझी असतो आई. सायन्स ला आहे मी. कॉमर्स किंवा आर्ट्स ला असतो तर रोज तुझ्याबरोबर बोलत राहिलो असतो.”
आई: “वेगळा वागतोस आजकाल. तुसडा पण झाला आहेस. काही झालंय तर सांग मला…”
आरुष: “व्हॉट द फक आई… काही नाही झालंय. उगाच काय तू… चल मी ठेवतो आता, बोलू नंतर…”
आरुष ने फोन ठेवला आणि आईने इच्छेविरुद्ध फोन ठेवला. तिला काय आरुषचं वागणं आजकाल बरोबर वाटत नव्हतं.
साडेसाती
निर्मला भाजीला फोडणी घालत होती. संध्याकाळचे सात वाजले होते आणि निमेशचा अजून पत्ता नव्हता. नितीन ऑफिस वरून परस्पर निमेश ला शोधायला गेला. पण अजून काहीच बातमी नव्हती. बस ड्रायव्हर फोन उचलतच नव्हता. ती दर १५ मिनिटांनी त्याला फोन करायचा प्रयत्न करत होती. नितीन काहीतरी कळवेल म्हणून ती वाट बघत होती. मनात विचार यायला लागले म्हणून ती कामाला लागली.
तितक्यात तिचा मोबाईल वाजला.
जादुई मनःशांति
बसमध्ये सगळ्यांचा गोंधळ चालू होता. रोहित तर खूप खुश होता. तो परीक्षेत वर्गातून पहिला आला होता. त्याच्या चेहऱ्यावर पुरेपूर समाधान आणि प्रसन्नता झळकत होती… आणि इकडे निशांत खूप उदास होता. एव्हढे प्रयत्न करून तो दुसरा आला होता. त्याची अपेक्षा होती यावेळी तरी तो पहिला येईल. तरी कितीपण अभ्यास केला तरी रोहित पहिला आणि निशांत दुसराच येई.
बस निशांतच्या स्टॉप वर थांबली.