Marathi Poems

हलकं फुलकं

आकाशातल्या ताऱ्याला
स्वतःशी नाही जोडल
सतत चढाओढ करणाऱ्या
वृत्तीला दूर सोडलं
निरपेक्ष आनंदात
मनाला वेडं केलं
अपेक्षांचं ओझं उतरवल्यावर
आयुष्य हलकं फुलकं झालं