घड्याळाचा गजर वाजला आणि रुहीचे डोळे सटकन उघडले. आजकाल ती अशीच उठायची. शॉक लागल्यासारखी. पण तिला बिछान्यातून बाहेर पडायला खूप कष्ट घ्यावे लागायचे. तेच ते आयुष्य, तीच ती सकाळ, तेच ते तिघांचे डबे बनवणं, तेच ते ऑफिस, तीच ती लोकल आणि बायकांची मचमच…, तेच ओंकारचा अभ्यास घेणं..तेच ते काम…. रोज तेच ते…तेच ते… बऱ्याच दिवस हे कंटाळलेपण तिला त्रास देत होतं… आयुष्य एक नीरस यंत्र बनलं होतं….
पण आज तिला अगदीच उठवेना.. बिछान्याने तिला जणू काही घट्ट धरून ठेवलं होतं… विक्रांत तीच्यानंतर एक तासाने उठायचा… तो झोपला होता… ती मानसिकरीत्या कोलमडून गेली होती.. कुठे सुट्टी घेऊन बाहेर जावं म्हटल तर जमा खर्चाचा ताळमेळ बसणार नव्हता.. ओंकार च पूर्ण शिक्षण बाकी होतं.. आता कुठे सातवीत गेला होता तो.. तिला मार्ग संपल्यासारख झालं… बराच वेळ असाच गेला..
तितक्यात तिचा फोन वाजला… एव्हढ्या सकाळी फोन… तिने टेबलवर ठेवलेला फोन घेतला.. फोन रीमाचा होता..
रीमा: “अग न्यूज बघते आहेस की नाही..”
रुही: “नाही ग काय झालं?”
रीमा: “अग आपली कंपनी बँक्रप्ट झालीय… बंद पडली..”
रूही ताडकन उठून बसली..
रूही:”अगं असं अचानक काय झालं?”
रीमा: “माहीत नाही पण आधीपासूनच गोंधळ होता म्हणे.. फक्त आपल्याला कळू दिलं नाही.. पॉलिसीज चां खप कमी होता एव्हढ तर ऐकून होतो ना”
रूही: “अगं जाऊन बघुया तरी..”
पूर्ण वाचा
Tag: Marathi Katha
मनाच्या भोवताली
नम्रताने, संदीपने भेट दिलेली साडी नेसली. नम्रताची सौंदर्य दृष्टीच चांगली होती. त्यामुळे तिचा ड्रेसिंग सेन्स, मेक अप सगळंच उत्तम असायचं. ती बऱ्याचदा संदीपला विचारायची, “मी मनाने अशीच असते पण दिसायला सुंदर नसते तर तू माझ्यावर प्रेम केलंच नसतं ना?” संदीपने याचं उत्तर कधीच नीट दिलं नव्हतं. तो मस्करीत तिला टाळत असे.
संदीप: “तू काय स्वतःला फार सुंदर समजतेस…”
नम्रता: “फार नाही पण आहेच ना?.. ”
संदीप चिडवल्यासारख हसतो..
नम्रता: “देईन फटका.. विद्रूप तर नाहीय ना?”
संदीप: “विद्रुपच आहेस म्हणून मी पसंत केलं…”
नम्रता: “हो हो… आला मोठा!”
नम्रता आणि संदीप नविन झालेल्या लाइट्स अँड साऊंड्स रेस्टॉरंट मध्ये निघाले. गाडीतून जाताना संदीप सतत फोन वर होता. आजकाल असच असायचं…संदीप सतत फोन वर.. भारावल्या सारखा तो यशाच्या मागे लागला होता… नम्रताचं आयुष्य म्हणजे फक्त संदीप आणि तिचे काही छंद… नम्रतासाठी संदीप बरोबरचा क्वालिटी टाइम फार महत्त्वाचा होता. संदीप कॉलेज मध्ये अभ्यासात फार हुशार नव्हता. पण त्याची नाती जपायची आणि जोपासायची गोड सवय नम्रतला भुरळ पाडून गेली होती. नम्रताला आजकाल संदीप कडे बघताना कुणी परकाच माणूस दिसत असे… पण तिला समजत होतं संदीप रमलाय… त्याला कामात स्वतःला झोकून देणं… यशाच्या पायऱ्या चढत जाणं आवडत होतं.
पण आज प्रोमोशन च सेलिब्रेशन फक्त तिच्याबरोबर साजरं करायचं ठरवलं होत त्याने… मग हा वेळ तरी त्याने इतरांना.. कामांना विसरावं असं वाटत होत तिला..
पूर्ण वाचा
एक दिवस
गजराच्या आवाजाने निमिता उठली. बघते तर घड्याळात फक्त ५ वाजले होते.
‘असा कसा ६ चा गजर ५ ला वाजला?’
आणि तिने गजर बंद केला. खिडकीच्या बाहेरही अंधार होता.
‘एक तास झोपू शकतो आपण. नाहीतरी रात्रभर कुठे झोप आली. बॉस ने काय अपमान केला सगळ्यांसमोर… तेव्हापासून झोपच आली नाहीय ना नीट. पहिल्या रात्री तर रात्रभर टक्क जागी होते. भूकही लागतेय अस वाटत नाहीय तेव्हापासून. रूटीन चालवायचं फक्त आपलं. आईला कळायला नको. तिने आयुष्यातली सगळी आव्हानं समर्थपणे पेलली. तिला वाटेल काय ही आपली मुलगी. साधं ऑफिसचं काम नीट जमत नाहीय. लागल्यापासून ओरडा खातेय. स्वतःवरचा विश्वास हळू हळू संपूनच जाईल की काय असं वाटतय…..
……….
अरे विचार करता करता ६ वाजले..
पूर्ण वाचा