Marathi Poems

तू एक अनुभव…

तेव्हा तू एक अनुभव होतास
मोरपिशी…चंदेरी…
जीवनाच्या सुखाचा अर्क
बेधुंद हरवून टाकणारा

आत्ता तू एक आठवण आहेस
अस्पष्ट कोमल
ऊर्जा देणारी
जीवनाची दिशा ठरवणारी…