आसावरी धावत धावत रिझल्ट लावलेल्या बोर्डकडे गेली. गर्दीत पुढे घुसून ती लिस्ट वर आपलं नाव शोधू लागली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. लिस्टवर तिचं बोट फिरू लागलं आणि तिच्या नावावर येऊन थांबलं. “सी ग्रेड”… ती ढासळली. एव्हढी मेहनत केली होती. सर पण म्हणाले होते, “बी ग्रेड” तरी मिळेल. पण एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षेत “सी ग्रेड” आणि इंटर्मिजीएट ड्रॉईंग परीक्षेतही “सी ग्रेड”. तिचे डोळे पाण्याने भरून आले…. ती आपला चेहरा लपवत वॉशरूम मध्ये गेली. दरवाजा बंद करून ती ओकसाबोक्शी रडू लागली. तिचं आयुष्य हादरलं होतं. चित्रकला तिचं पाहिलं प्रेम होतं. ती हरवून जात असे चित्र काढताना…ती बॉर्न टॅलंटेड नव्हती. पण तिने खूप मेहनत केली होती. पण… नशिबाच्या आधी आणि नाशीबापेक्षा जास्त कोणाला काय मिळतं??…
Tag: laghukatha
हुरहूर
अरेंज मॅरेज…श्रध्दा ने कधी विचारच केला नव्हता. तिने तर लग्नाचाच विचार केला नव्हता. नॅशनल लेव्हल वर कबड्डी खेळताना तिच्या मनात फक्त जिंकण्याचेच विचार असायचे. पण घरचं प्रेशर! वय निघून जाईल, चांगले मुलगे संपतील आणि काय काय! पहिल्याच मुलाची सांपत्तिक स्थिती, घर दार, सगळं चांगलं निघालं. चौकशीतही मुलगा छान आहे असं कळलं. तिला नाहीतरी कुठे काय कळत होतं लग्नातलं. तिने विवेकला होकार देऊन टाकला….
भ्रष्टाचार
ग्धा धावत घरात शिरली आणि तिने बॅग सोफ्यावर टाकून दिली.
मुग्धा: “आई भूक लागली.”
आई: “मुग्धा काय हे!!! बॅग नीट ठेव आधी मगच जेवण.”
मुग्धा: “आई एव्हढं काय अडतं…”
आई: “शिस्त असली पाहिजे बाळा. घर व्यवस्थित दिसलं पाहिजे ना. दुसऱ्यांसाठी नाही. आपल्या मनाला बरं वाटतं.”
मुग्धा ने कंटाळत बॅग जागेवर ठेवली.
मुग्धा: “ठेवली आता दे जेवण.”
आई: “अगं कपडे बदल, हात पाय धु.”
मुग्धा: “ते करते ग मी…”
मुग्धा हात पाय धुवायला गेली. इकडे मुग्धाने ठेवलेली बॅग टेबलवरून खाली कोसळली. आणि बॅगेची चेन पण लावली नव्हती म्हणून काही पुस्तकं बाहेर पडली. आईने डोक्यावर हात मारला आणि ती बॅग उचलायला गेली. बॅग उलटी पडली होती त्यामुळे आईने पटकन बॅग उचलताच सगळं सामान बाहेर पडलं.
आई: “काय हे.” असं म्हणत आईने बॅग नीट आवरायला घेतली. मुग्धाला सगळ्याचे क्लास लावले होते त्यामुळे आईला फार अभ्यासात लक्ष घालावं लागत नसे. मुग्धा होती पण चुणचुणीत आणि अभ्यासात हुशार त्यामुळे काहीच टेन्शन नव्हतं. आईने म्हटलं बघूया हिच्या वह्या. आणि ती एक एक वही चाळायला लागली. तिने काही वह्या बघितल्या. मुग्धाचं हस्ताक्षर बघून ती खुश झाली. बऱ्याच उत्तरांना पैकी च्या पैकी मार्क्स होते. आई समाधानाने एक एक वही बघत होती. तिने हिस्टरी च बुक ठेऊन द्यायला उचललं आणि अचानक त्या पुस्तकातून पैसे जमिनीवर पडले. आईने आश्चर्याने पैसे उचलले. पूर्ण २१० रुपये होते ते. आईला आश्चर्य वाटलं. आपण तर मुग्धाला पैसे देतच नाही. मग तिच्याकडे एव्हढे पैसे कुठून आले…