नियती आणि चॉईस
असं मिक्स असतं लाईफ
कधी ती जिंकते कधी मी
कधी इक्वल होते फाईट
Tag: kavita
फूल
ऐ जिंदगी तेरे दामन से
धूल उड़ा दूंगी
तू फेकेगी पत्थर
उसको मैं फूल बना दूंगी
व्यक्तिमत्त्व
निरनिराळ्या रंगाच
वेगवेगळं महत्त्व
असतं एकदम खास
प्रत्येक व्यक्तिमत्त्व
हलकं फुलकं
आकाशातल्या ताऱ्याला
स्वतःशी नाही जोडल
सतत चढाओढ करणाऱ्या
वृत्तीला दूर सोडलं
निरपेक्ष आनंदात
मनाला वेडं केलं
अपेक्षांचं ओझं उतरवल्यावर
आयुष्य हलकं फुलकं झालं
आपणच
कुणाला काहीही वाटो
त्याने काय फरक पडतो?
फरक तेव्हाच पडतो
जेव्हा आपणच मनात कुढतो
नशिब
कधी कधी
नाही जुळू शकत दोन टोकं
नशिबाच्या भाळावर असतात
परिस्थितीची भोकं !!
तेव्हाच खरं जगतो
गाण्यात धुंद होतो
प्रेमात बुडतो
गप्पांमध्ये रंगतो
निसर्गात रमतो
माणूस स्वतःला विसरतो
तेव्हाच खरं जगतो
वारा पांघरून
कुठे सतत वेड्यासारखं
स्वप्नांमागे धावणं
कधीतरी हवं वारा पांघरून
गवतावरती झोपणं