Satirical Marathi Articles

कामवाली बाई आणि तिचे प्रताप

मबईत तरी अशी प्रथा आहे की कामवाली बाई कोणत्या ना कोणत्या कामासाठी असतेच. आणि ज्यांच्याकडे नाही ते तिची स्वप्न बघतात. पण कामवाली बाई असणं हे सोप्पं काम नाही राव. नुसतं बाई मिळाली म्हणून खुश होऊन चालत नाही… तिच्याबरोबर जमवून घेताना मालकिणीच्या सहनशक्तीची परीक्षा असते! आणि तिच्या कंपलेंट्स ऐकून घेणं हे मालकाचं रोजचं महत्वाचं काम. चला तर मग
पूर्ण वाचा

Satirical Marathi Articles

शाळा

रम्य ते बालपण आणि रम्य ते शाळेचे दिवस असं म्हटलं जातं. पण माझं डोकं नेहमीप्रमाणे उलटंच फिरतं. कधी कधी वाटतं देवाने माझा मेंदुच वेगळ्या पदार्थाचा बनवलाय. मला आठवतो शाळेचा पहिला दिवस. जेव्हा मी एकसारखे कपडे घातलेल्या कळपाचा भाग बनले. आणि एका मुलीने मी ग म भ न लिहीत असलेली पाटीच पुसली. ही एक गोष्ट चांगली झाली. जगात वावरताना खायच्या टप्प्या टोमण्याचं ट्रेनिंग इथे सुरू झालं. …

Intense Marathi Articles

सुंदर क्षण

काही क्षण वेगळेच असतात! अस्तित्वाशी घट्ट जोडलेले, भूतकाळ भविष्यकाळ यांच्याशी धागे तोडणारे. जसा गावचा मुसळधार पाऊस… ढग गडगडतात… विजा लखलखतात… आणि मनात काहूर! असंख्य स्वप्नांची रेलचेल… त्यात वीज जाऊन

Intense Marathi Articles

पाऊस प्रत्येकाचा

पाऊस प्रत्येकाचा असतो आणि प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो… पाऊस ही एक गरज… कुणासाठी मानसिकही…

उदासीच्या कोपऱ्यात रुसून बसलेलं कुणी एक कवीमन अचानक येणाऱ्या पहिल्या पावसात न्हाऊन निघतं आणि आयुष्यात काहीच नसलं तरी ते सुंदर आहे याची अनुभूती देऊन जातं…

Intense Marathi Articles

देव देव्हाऱ्यात नाही?

लहानपणापासून गणपती म्हणजे देव अशी समजूत झाली. पण मोठे होता होता समजुतीत भगदाडं सापडली. देव आहे तर सगळे सुखी का नाही? देव आहे तर वाईट गोष्टी का होतात? देव आहे तर अस का तसं का? शास्त्राने प्रगती केली आणि अनेक चमत्कारांचे गूढ उकलल. माणूस शक्तिशाली प्राणी बनला. आणि कधी सवयीमुळे…

Satirical Marathi Articles

फेसबुकीया, व्हॉट्सऍपिया – अर्थात सोशल मीडियाया

कुणाला मलेरिया होतो कुणाला चिकनबुनिया. पण जवळ जवळ प्रत्येकाला झालाय तो आजार म्हणजे फेसबुकीया, व्हॉट्सऍपिया, अर्थात सोशल मीडियाया. याची सुरुवात होते “भला उसके लाईक मेरे लाईक से जादा कैस?” या भावनेने. काही महाभाग तर भेटलेल्या प्रत्येकाला फेसबुक मध्ये ऍड करत जातात. भलेही ती “फ्रेंड्स लिस्ट” असो आणि भेटलेल्या माणसाचा फ्रेंड या शब्दाशी काही संबंध नसो.

माझा एक मित्र हनिमूनला गेला होता. प्रत्येक ठिकाणी काढलेला फोटो तिथून तो फेसबुक वर अपलोड करत होता.

Satirical Marathi Articles

त्यांनी मरताना “हे राम” म्हटलं नसेल म्हणून

कदाचीत ब्रह्मदेव, शंकर हे लोकंच त्रिशूळ, ब्रह्मास्त्र वगैरे घेऊन अवतरले असतील (देव अवतरतात असं यासाठी म्हणत असतील की ते विमान, हेलिकॉप्टर सदृश्य कुठलेही वाहन न घेता त्यांच्या स्वर्गातल्या हिंदू एरियातून अलगत उतरतात किंवा कुठला ना कुठला अवतार घेऊन उतरतात.) आणि त्यांनी नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या घातल्या असतील. छे!! काहितरी गल्लत होतेय. त्रिशूळातून गोळ्या कशा सुटतील!पण म्हणून तर कुणी पकडलंच जात नसाव. पृथ्वीवर मिशन कंप्लिट करून डायरेक्ट स्वर्गात फरार होणारे देव मुंबई पोलिसांना कॅमेऱ्यात आणि प्रत्यक्षात दिसणार तरी कसे, हीच सगळ्यात शक्य वाटणारी शक्यता आहे. (मानलत ना माझ्या अचाट बुद्धीमत्तेला) शेवटी हिंदू धर्माचा अल्टिमेट कॉपीराईट, हिंदुत्ववादी राजकीय पक्ष आणि संस्थांनंतर देवांकडेच असणार ना!

Satirical Marathi Articles

दुनियादारी

बाप अपुन भी अब किसी हिंदी पिक्चर से कम नही. जबरदस्त मसाला आणि “प्रेम” हा सगळ्यांचा फॉरेव्हर जिव्हाळ्याचा विषय. “टीक टीक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात” हे लहान मुलांच्या कोरस मधलं गाणं मी उडत उडत ऐकलं होतं तेव्हा मला वाटल “व्वा! परीक्षेवर गाणं बनवलं वाटतं कुणीतरी” त्यानंतर प्रत्यक्षात ते गाणं पाहिलं. लोकांनी एवढ डोक्यावर घेतलं की सोशल नेटवर्किंग चं स्टेटस “टीक टीक वाजते डोक्यात…” लोकं उगाचंच आपले “टीक टीक वाजते डोक्यात” असं पोस्ट करायला लागले आणि २००० लाईक्स. या सगळ्या वातावरणात मी माझा सुरुवातीचा गैरसमज गुपचूप दडवून टाकला जसं काही झालंच नव्हतं