हे असं कोणतं नातं आहे… जिथे सारे हिशोब संपू पाहत आहेत…
Category: Marathi Paintings
आशा
आशा जिवंत असली की आपला प्रवास छोटासा निनावी असला तरी सुंदर होतो.
कुटुंब
एकट्याने मस्त प्रवास होऊ शकतो. पण बांधून घेणं ही मनातली खूप खोल गरज आहे.
भक्ती
भक्ती ही अशी भावना आहे जिची काहीच अपेक्षा नसते. ती निस्वार्थपणे नतमस्तक होते.
आनंद
आयुष्यात खळाळून वाहणारा आनंद असला की आयुष्य नुसतं वाहत राहतं, वाटेत येणाऱ्या कुठल्याही अडचणींची पर्वा न करता
दुःख
कदाचित दुःख होऊ शकलं असतं, जर अपेक्षांचं ओझं लादलं असतं.
मावळती
मावळतीला कसं वाटेल? आयुष्य संपण्याची खंत असेल की पूर्णत्वाची भावना?