प्यार करना आसान है
रिश्ता निभाना मुश्किल
कभी खुद को मोड़ना
कभी तो तोड़ना पड़ता है।
Author: Writebits
प्रेम
कोण कुणाचं काय लागत
सगळ खरंच फेल असतं
तीच नाती खरी
ज्यांचं नाव प्रेम असतं
काही फरक पडत नाही
काही फरक पडत नाही
काही असण्याने काही नसण्याने
आयुष्य पूर्ण सजत
स्वतः स्वतःचा मित्र असण्याने
देव
आपण माणूस असतो अन
परिस्थितीचे बंधही असतात
पण विश्वास ठेवला देवावर
की बिघडल्या घटना सुद्धा सजतात …
माणूस
उगाच वाईट करू नये
माणुसकीला जागावं
चांगली कामं करण्यासाठीच
माणूस म्हणून जगावं
ताई
अजूनही आनंद होतो
तिला अचानक पाहून
थोड्याशा विसाव्याला
हक्काची कूस मिळते
कीतीही मोठं झाले
केस पिकले तरीही
जीवाला जीव देणारी
ताई ही ताईच असते
Chase your Happiness
कल्पनेचा पक्षी
उडूदे कल्पनेचा पक्षी
मुक्तपणे नभात
राहू नये थोडेही
परिस्थितीचे बंध मनात!