त्याने दिली होती
हृदया वरची
ती खोलवर गेलेली
सुकून उरलेली
काळीकुट्ट जखम
आणि कदाचित
स्वप्नांना कचकन पडलेला
सर्वात मोठा तडा
तेव्हाचाच होता…
फिरून पुन्हा जेव्हा
त्याला सावरायला दिला
निस्वार्थ कोरडा हात…
तेव्हा विचार आला
सगळ्या अपेक्षांपलीकडे
सगळ्या नात्यांना कवटाळून
निरागसपणे हसणारा गोडुला
किती आहे भाबडा
हा जिव्हाळा…