असं काही नसतं की
आपलंच बरोबर ठरावं
प्रेम नात्यात टिकण्यासाठी
थोडं नमतं घ्यावं
भांडूही ओरडूही
नात्यात नसेल जर भीती
पण अशी भांडून नाती
तोडाल तरी किती?
शक्य तेव्हढी समजून घ्यावी
समोरच्याची अडचण
दुसऱ्याच काही कारणासाठी
रागात असेल तो पण
नातं दुरचं किंवा जवळचं
वीण बांधत जावी
मैत्री असावी प्रत्येक नात्यात
झालं जरी काही