आज कशाची गरज भासू नये
एव्हढी परिपूर्ण झालेय…
पुढे काही सुचू नये
एव्हढी व्यक्त झालेय…
पुढे काही असू नये
या उंचीवर आलय आयुष्य…
काहीच उरु नये
इतकं जगून गेलेय…
आता फक्त…
मोकळे श्वास…
आयुष्याचं गाणं…
आणि उडण्यासाठी
मुक्त आभाळ!
आज कशाची गरज भासू नये
एव्हढी परिपूर्ण झालेय…
पुढे काही सुचू नये
एव्हढी व्यक्त झालेय…
पुढे काही असू नये
या उंचीवर आलय आयुष्य…
काहीच उरु नये
इतकं जगून गेलेय…
आता फक्त…
मोकळे श्वास…
आयुष्याचं गाणं…
आणि उडण्यासाठी
मुक्त आभाळ!