अनेक महिन्याच्या दुराव्यानंतर
मी तुला स्पर्श करेन
तेव्हा चांदण्यांचे पडसाद उमटतील माझ्या मनात
रात्रीच्या अंधाऱ्या गर्भातही
चंद्र उगवेल
पुन्हा एकदा…
आणि माझं हृदय…
ते तर उन्मुक्त वाहणारा वारा बनेल
खळखळून वाहणारा झरा बनेल
आणि बघता बघता
आभाळातला चंद्रच बनून जाईल…