उगवणाऱ्या सुर्यासारखी
लाल तांबूस लाली घेऊन
जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलास
तेव्हा मी नव्याने जन्मले.
तुझ्या डोळ्यांतून स्वतःला पाहताना
पूर्णत्व असलेले दिसू लागले मी मला
आणि जगण्याची
एक वेगळीच जिद्द उभारी घेऊन आली.
रोजचे रटाळ दिवस रात्र
तुझ्या आठवणींनी सजले.
आणि तुझ्या अस्तित्वात
माझं अस्तित्व पाहताना
मी नव्याने जगले…