मनाच्या एका कप्प्यात काही आठवणी थिजून जातात. कधी कधी त्यांचं बोचरं अस्तित्व मेंदूच्या वळ्या फोडून बाहेर येतं आणि संपूर्ण अस्तित्वच विसकटून जातं. त्या अभेद्य आठवणी आयुष्यभर चिघळत राहू नयेत म्हणून त्यांचा निचरा होणं आवश्यक असतं. परिस्थितीच्या आवरणाखाली दबलेल्या आयुष्यात तेव्हाच्या तेव्हा त्यांची पाळ मूळ उपटून टाकली तर आयुष्यभराचा त्रास वाचू शकतो.