कितीही असहाय्य व्यथा सांग
मला कधीच कळणार नाही
अपूर्ण या व्यवहाराला
मी प्रेम म्हणणार नाही…
कसमे वादे फिल्मी धोंड
गळ्यात तूच बांधली होतीस
प्रेमाचं स्वप्नाळू सोंग
तुझीच सारी करणी होती
मी तडजोडीत जोडल होत
इतर स्त्रियांसारख मन
सुपर वुमन बनण्यासाठी
उसना आणला होता जोम
व्यवहार मला ठावूक होता
उगाच नेलस स्वप्नांच्या गावी
अपूर्ण या व्यवहाराला
मी प्रेम म्हणणार नाही…
