मेंदू म्हणतो
तोड भावनांचे वेडे मनोरे
फसव्या मनाचे
खोटेच खेळ सारे
अर्थहीन शब्दांचं
किचकट जाळं वीणतील
मनावर विश्वास ठेवलास
तर शून्य बनून उरशील
जगाला कोणता रंग नाही
नाही जगण्याला अर्थ
मी जस सांगतो तसा
तूच आहेस तुझा मार्ग
व्यवहार खरा आहे
स्वार्थ सुद्धा खरा
तूच तुझं उत्तर बनून
बन एक उत्तुंग मनोरा!