Marathi Very Short Stories

दृष्टी – अ. ल. क. – ४

मुग्धा हसरी चर्या ठेवण्याचा आणि निस्तेज डोळे लपवण्याचा प्रयत्न करत गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात वावरत होती…
कुणीतरी मोठ्याने म्हणालं “वा फॉल सीलिंग वरची नक्षी किती छान आहे!” मुग्धाने आपसूक वर पाहिलं. एकमेकांत गुंतलेल ते फुला फांद्यांच जंगल तिला ओढाताण करत असल्यासारख दिसल… तितक्यात तिचा फोन वाजला.. एक लांब सुस्कारा सोडून तिने तिच्या नवऱ्याचा निनादचा फोन उचलला…”मुग्धा रिअली सॉरी! चुकल माझ… आणि आईच्या वतीने पण मी माफी मागतो… ती वाईट नाहीय ग.. वाट बघतेय तुझी ती सुद्धा..  कुठे गेली आहेस.. फोन पण उचलला नाहीस किती वेळ…” मुग्धा च्या डोळ्यात पाणी तरारल.. गुपचूप डोळे पुसून ती म्हणाली “येते मी घरी मग बोलू” तिने फोन ठेवला आणि पूर्वीच्या फॉल सीलिंग वरच्या संभाषणाच्या अनुषंगाने वर पाहिलं…आता तिला दिसली फुला पानांनी बहरलेली सुंदर नक्षी.. एकमेकांत गुंफून अस्तित्व सुंदर बनवणारी…..

One thought on “दृष्टी – अ. ल. क. – ४

  1. Khup chan aahe katha Asach chan chan lihit raha.
    Tu majhi bahin aslyacha abhiman aahe mala. Malahi khup kahi lihavas vatat pan mala velach nahi milat.
    Keep it up sister.👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *