का करावे विचार
कुणी कुणाच्या आयुष्याविषयी
की तो जगतोय विलासी आयुष्य
दुसऱ्यांसाठी तो काय करतोय?
फक्त स्वतःलाच तर जपतोय..
किंवा विषयसुखांमध्ये लडबडलेली
सगळी पिढीच वाया जातेय…
शुन्यामध्ये उगाच भरून स्वतःचे अर्थ
फक्त चर्चांचा फेस
मग बोलणाऱ्यांचाही वायाच ना…
शब्द लंगडे खुजे खूप वाहतायत
समाजातून सगळीचकडे…
प्रत्येक सुजाण समजेच्या गर्भातून
होऊदे आता
जन्म फक्त कृतीचाच !!!!