सळसळणाऱ्या पावसात
प्रेम धुंद होऊन
हातात हात गुंफतो
तेव्हा आपण “जगतो”
मैत्रीच्या बैठकीत
हास्याच्या जल्लोषात
भान विसरून रमतो
तेव्हा आपण “जगतो”
एकांताच्या ध्यान मंत्रात
स्वतःचा मोकळा सूर
स्वतःलाच गवसतो
तेव्हा आपण “जगतो”
जबाबदारीचं ओझं जाऊन
“तुझं – माझं” भेद संपून
कुटुंब होऊन वसतो
तेव्हा आपण “जगतो”
अर्थ लागेल कसाही!
गणित सुटेल जसेही!
असेल जरी काहीही!
वाटले असावे कसेही!
जिथे आहोत जसे आहोत
अनुभवांचे सगळे धडे
गाण्यामध्ये रचतो
तरच आपण जगतो!