तशी तर रागावण्यासाठी
बरीच कारणं आहेत
पण मनाचा तोल सांभाळायला
शांत राहणं भाग आहे
तशी तर रडण्यासाठी
बरीच कारणं आहेत
पण खंबीरपणे साथ द्यायला
हसणं भाग आहे
तशी तर थांबण्यासाठी
बरीच कारणं आहेत
पण आयुष्याला अर्थ यायला
चालणं भाग आहे
तसं तर हरवण्यासाठी
दिवस संपत आहे
पण उगवतीला त्यावर मात करत
जिंकणं भाग आहे!