सुकून गेल्या पाकळ्या
आणि झरून गेलं चंदन
या धकाधकीत शब्दांचं
उडून गेलं अत्तर…
दुःख रुतत नाही
तर सुख कुठून फुलेल?
टिकटिकणाऱ्या काट्यांना
गीत कसं स्फुरेल?
नेहमी वाटत राहतं
कधीतरी पाझर फुटेल
गर्दीमधल्या अस्तित्वाला
व्यक्त अव्यक्त कविता भेटेल!
सुकून गेल्या पाकळ्या
आणि झरून गेलं चंदन
या धकाधकीत शब्दांचं
उडून गेलं अत्तर…
दुःख रुतत नाही
तर सुख कुठून फुलेल?
टिकटिकणाऱ्या काट्यांना
गीत कसं स्फुरेल?
नेहमी वाटत राहतं
कधीतरी पाझर फुटेल
गर्दीमधल्या अस्तित्वाला
व्यक्त अव्यक्त कविता भेटेल!