सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे!!!! हो! मी “जनम जनम” ची “एकटी” आहे. नाही नाही वाईट नाही वाटत मला… त्याच काय झालं “मैंने प्यार किया.” पण “हम आपके है कौन” विचारल्यावर प्रत्येक “लव्ह स्टोरी” चा शेवट “याराना” मध्येच झाला. कधी कधी दुःख गिळून मी सांगून पण बघितलं “रहना है तेरे दिल मे” पण नेहमीच समोरून उत्तर आलं ‘अरे फक्त “यारियां” आहेत ना आपल्यात’. काही वर्षानी माझं वजन वाढलं आणि मग माझ्या प्रत्येक लव्ह स्टोरी चा शेवट “हाथी मेरे साथी” मध्ये होतोय असा फील यायला लागला. पण काय करू “कुछ कुछ होता है” ना आणि “दिल तो पागल है” मग “दिल चाहता है”. आणि हा पण विचार केला पाहिजे ना की “जिंदगी ना मिलेगी दोबारा”. पण “साजन” मिळतंच नव्हता. मग कधी कधी डोकं “सैराट” व्हायचं. वाटायचं माझा “हिरो” कुठे आहे…. त्यात प्रेमात “झीरो” असल्याचा “कलंक” लागणार तो वेगळा. पण नंतर कळून चुकलं, आपल्या आयुष्यात “आशिकी” होणे नाही. “कयामत से कयामत तक” हाच “सिलसिला” राहणार. श्या!!! मेरा “दिल बेचारा”. मग सोडून दिलं… जाऊदे “डिअर जिंदगी” आपली “कहानी” वेगळी आहे. पण आपण “देवदास” नाही झालो हा! म्हटलं आपण आयुष्यातले “खिलाडी” बनायचं. जगण्यात असा “आनंद” भरला ना की सगळ्या प्रेमात “फना” झालेल्या लोकांना “दिल से” वाटायला लागलं, ‘सगळ्यांच्या आयुष्यात ठरलेलं “कभी खुशी कभी गम”, पण ही तर एकदम “रॉकस्टार” सारखी जगते यार!’ मग काही मैत्रिणी हळूच मला म्हणाल्या, ‘असा काही प्रेमाचा “राबता” वगैरे नसतो हा’… ‘कशाला हवा “विवाह”?’ काही तर म्हणाल्या ‘तो बाहेर पायावर पाय ठेवून टी व्ही बघत बसलाय ना माझा एक्स प्रियकर, तोच “एक व्हिलन” आहे’. काही मित्र सुध्दा म्हणाले, ‘आता तर “मौसम” असा झालाय की पूर्वीचं आठवून वाटतं “वो कौन थी?”. मग मी “प्यासा” नाही राहिले. उलट ज्याला त्याला खांदा देऊन म्हणायला लागले “मैं हू ना”! आणि मग काय सांगता राव!!! माझे खूप “फॅन” झाले, आयुष्य “खूबसुरत” झालं आणि माझ्या मनात पक्कं झालं मीच माझ्या आयुष्याची “क्वीन” आहे हेच “वास्तव” आहे!!
मस्त लिहिलंय पिंकी 👍
खूप छान लिहिलंयस. कस काय सुचत तुला मला खूप आवडलय अशीच लिहीत रहा स्वतःची वेदना अगदी अचूक सांगितलीस
Khup chhan Sheetal, basically hya saglya kade vinodi Buddhi ne baghnya cha ani positive rahnya cha approach khup chhan vatla..