निशांत संकेतच्या घरात त्याच्या बाजूला बसून एडिटिंग कसं होतंय ते बघत होता. पण त्याचं पूर्ण लक्ष त्यात नव्हतं. तो सारखा मोबाईल तपासत होता. लातूरच्या अप्रतिम अज्ञात गायकावरचा लेटेस्ट व्हिडीओ टाकला होता ‘अन्नोन वाईब्स’ या त्यांच्या यूट्यूब चॅनेल वर, त्याच्या ग्रुपने. निशांत सारखा व्ह्यूज आणि लाईक्स बघत होता. पण या वेळीही हवा तेवढा प्रतिसाद नव्हता. हजार लाईक्स होतील म्हणून त्याचा ग्रुप कधीपासून वाट बघत होता. पण एव्हढे छान मनोरंजक व्हिडीओज टाकूनही ग्रुपमध्ये एकूण असलेल्या तिघांपैकी कोणाचेच ओळखीचे फॉरवर्ड करत नव्हते बहुतेक. हळू हळू सब्सक्रायबर्स वाढतील म्हणून एक वर्ष वाट बघून निशांत थकला होता. एक वर्षात सगळे नोकरीला लागले होते. स्वतःचा पैसा टाकून तिघे मित्र व्हिडीओज बनवत होते. एखादातरी व्हिडीओ वायरल जावा. पण नाहीच…
पूर्ण वाचा