Marathi Short Stories

पुन्हा एकदा…

चिंटू घरभर नवीन रिमोटची कार घेऊन फिरत होता. धावपळ करणारी त्याची आई संध्या, मध्ये मध्ये येणाऱ्या चिंटूला दटावत होती. चिंटू सॉरी आई म्हणत होता पण त्याची कार नवीन असल्याने त्याला आवरता येत नव्हती आणि मधेच स्वयंपाकघरात शिरत होती. चिंटूच्या आजी लक्ष्मीबाई आईला स्वयंपाकात मदत करत होत्या. चिंटूचे आजोबा नरहर खरे सुद्धा तिथे लुडबुड करत होते. खरे कुटुंब म्हणजे गुण्यागोविंदाने एकत्र नांदणार कुटुंब. एक गोष्ट फार वेगळी होती. बायकांची कामं पुरुषांची कामं असा भेदभाव नव्हता. संध्या सरकारी नोकरीत छान सुप्रीटेंडन्ट होती. लक्ष्मीबाईंनी शाळेची मुख्याध्यापिका बनून निवृत्ती घेतली होती. चिंटूला सध्या थोडी थोडी कामांची सवय लावली जात होती. आईचं स्पष्ट मत होतं की जेवण बनवणं, घरची काम करणं हे लाईफ स्किल आहे आणि ते सगळ्यांना आलंच पाहिजे. सगळेजण मिळून मिसळून काम करायचे आणि सगळे मिळून मिसळून रिकामा वेळ साजरा करायचे. खूप गप्पा मारायचे, चिंटू बरोबर खेळायचे, कॅरम, पत्ते, आणि खूप धमाल.
पूर्ण वाचा

Marathi Short Stories

एक जिवंत माणूस

दिपिकाचे डोळे उघडले. फक्त ५ वाजले होते. “झोपेनेही साथ सोडली की काय!” तिच्या मनात आलं. समोर दिवस आ वासून अस्ताव्यस्त पसरला होता. ती उठली पण एव्हढ्या लवकर काय करणार म्हणून परत झोपली. करोना येऊन २ वर्ष आणि नोकरी जाऊन बरोब्बर एक वर्ष. छतावर पंखा गर गर फिरत होता. त्याच्या कटरकट्ट कटरकट्ट आवाजाची एक त्रासदायक लय निर्माण झाली होती.
पूर्ण वाचा