मलाही वाटतं
माझ्यावर कुणीतरी
मनापासून प्रेम करावं…
अपेक्षांच्या पलीकडे
सुंदर एक नातं असावं…
थोडं त्याने बदलावं
थोडं बदलेन मी
आमचं एक छानसं
घरकुल व्हावं…
मलाही वाटतं
माझ्यावर कुणीतरी
मनापासून प्रेम करावं…
भांडण होईल कधीतरी
तरी असावी ओढ
चुका माफ कराव्यात
म्हणावं
चल जाऊदे सोड…
थोडी कामं मी करेन
थोडी करेल तो
असा सुखाचा संसार
माझ्यासोबत करेल तो…
असे दिवस रात्र जात
आयुष्य हे स्वप्नं व्हावं…
मलाही वाटतं
माझ्यावर कुणीतरी
मनापासून प्रेम करावं…