Marathi Poems

संसार

मला माहीत आहे
त्रासून कधी तू चिडशील
पण जेव्हा गरज असेल
तेव्हा माझ्यावरच तू प्रेम करशील

कठीण रस्त्यावर सावरताना
तुझाच आधार मिळेल
संसार संतुलित कसा करावा
तुला बरोबर कळेल

आजारी असताना डोक्यावर
हाथ जेव्हा असेल
रोजच्या धकाधकीच्या जीवनातला
सगळा त्रास मिटेल

घड्याळाच्या काट्याबरोबर पळताना
रोज होईल कसरत
पण तुझ्या मिठीत शिरल्यावर
सगळं मिळेल अलगत

संसार संसार म्हणतात त्याने
आपण थोडे दमतो
तरीही एकमेकांच्या सोबतीत
आपण पूर्ण रमतो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *