घरी मुलं दोन दोन
पण सोबत वेळ घालवायला
फुरसत नाही
कुठे फिरायला गेलो तरी
कामातुन ब्रेक नाही
डूलताहेत झाडं टेरेस मध्ये
पण स्पर्श त्यांना केला नाही
आयुष्य एव्हढं व्यस्त
की श्वास घ्यायला फुरसत नाही…
मॉडर्न आयुष्याची हीच आहे कहाणी
गाडीतून आरामात फिरतोय पण
श्वास घ्यायला प्रदूषित हवा
झालेला स्ट्रेस घालवायला
दारुसारखा सोबती हवा
बायकोची नेहमीच कटकट होते
बॉस बसलाय डोक्यावरतीच
पगारवाढ होतच राहते पण
वाढत जातात स्वप्न तितकीच
कुठे चाललोय कसली प्रगती
सगळ्यांना आहे हा प्रश्न नवा
मॉडर्न या आयुष्याचा
हाच आहे मोड नवा