ती डॉक्टरकडे रिपोर्ट्स घेऊन बसली होती. आई वारली, भाऊ वारला, लग्न मोडलं, आणि बरच काही… ती निराश नव्हती… ती खूप शांत आणि प्रसन्न होती. जणू काही ती देवत्वाला पोहोचली होती. डॉक्टर ने रिपोर्ट्स पाहिले. “मॅडम कॅन्सर पॉझिटिव्ह आहे.” ती मंदसं हसली. आणि अनुभवांच्या मोठ्या गाठोड्यात तिने अजून एक अनुभव बांधून घेतला…