असं वाटत होतं
मी परिपूर्ण आहे
जगात तसंही सारं
अपूर्ण आहे!
पण तुझं भेटणं
वेगळीच दृष्टि देऊन गेलं
अपेक्षेच्या पलीकडे
आनंद घेऊन आलं
तुझ्याशिवाय मी
असं गणित होणार नाही
आयुष्यात घडामोडी
असतील काही
खोट्या समाधानाचे
बंध तोडले
पहिल्यांदाच
देवापुढे हात जोडले…