मी जगातली
सगळ्यात सुंदर व्यक्ती असते
पाहाते जेव्हा तुझ्या नजरेतून
मी झुळझुळ वाहणारे पाणी
मी अल्लड गोड गाणी
पाहाते जेव्हा तुझ्या नजरेतून
प्रत्येक श्वास
मन भरून घेते
पाहाते जेव्हा तुझ्या नजरेतून
मी गार गार वारा
मी स्वयंपूर्ण राणी
पाहाते जेव्हा तुझ्या नजरेतून
मी फक्त स्त्रीच नाही
पण माणूस म्हणून जगते
पाहाते जेव्हा तुझ्या नजरेतून