थोडं चुकलो
थोडं बिघडलं
झालं ते झालं
आयुष्य अजून
वाहतंय ना
थोडसं
गढूळ पाणी साचलं
झालं ते झालं
परीपूर्ण तसंही
काय आहे जगात
थोडसं विस्कटलं
झालं ते झालं
सुंदर उद्या बोलावतोय
नवीन काही घेऊन येतोय
चला त्याचं स्वागत करूया
बघा सूर्य उगवतोय
प्रकाशाने
डोळ्यांचं पारणं फिटलं
झालं ते झालं