Marathi Poems

आपण मोठे का होतो?

मायेची उब हरवते
आणि आशीर्वादाचा हात हरवतो
आपण मोठे का होतो?

सगळ्या जबाबदर्यांच्या ओझ्याने
मनाचा तोल डगमगतो
आपण मोठे का होतो?

खरच का
कमवायचे असतात पैसे?
खरच का मान मरताब हवा असतो?
निरागसतेचा सौदा करून
फुका मोठेपणा मिरवतो
आपण मोठे का होतो?

देवा मला तेच लहानपण दे
उन्मुक्त वाऱ्याबरोबर धावत जाऊ दे
पावसाच्या सरीमध्ये विनातक्रार भिजू दे
थोडासा अभ्यास आणि खूप मज्जा करू दे

कुठे झेंडे गाडायचेत म्हणून
लोकांना उपदेश शिकवतो
देवा अजाण बालपण सोडून
आम्ही मोठे का होतो????
आम्ही मोठे का होतो????
आम्ही मोठे का होतो???? 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *