आपलं काय आहे?
मग कशाला मागायचं…
आयुष्य एक भेट
मजेत जगायचं
मिळालं किती..गेलं किती
हिशोब आहे फुटकळ
घेता घेता
देत देत जायचं
आयुष्य एक भेट
मजेत जगायचं
कोण मोठा..कोण छोटा
परिस्थिचे सारे फेरे
आपल्या वाट्याचं
मन लावून खेळायचं
आयुष्य एक भेट
मजेत जगायचं
मरण येतं जवळ
प्रत्येकाचं अटळ!
काय शेवटी उरणार
म्हणून फुकट रडायचं?
आयुष्य एक भेट
मजेत जगायचं